Home परभणी रेल्वेरुळावर मुलीचा मृतदेह आढळला, अपघात की घातपात?

रेल्वेरुळावर मुलीचा मृतदेह आढळला, अपघात की घातपात?

Parbhani Crime:  रेल्वे पटरीच्या रुळामध्ये शनिवारी सकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास मुलीचा मृतदेह (Dead Body) आढळून आला.  हा नेमकी अपघात की, आत्महत्या (Suicide) पोलीस अधिक तपास करीत आहे.

Girl's body found on the railway track, accident or suicide

परभणी: शहरापासून काही अंतरावरील रेल्वे पटरीच्या रुळामध्ये शनिवारी (ता.०८) रोजी सकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास मुलीचा मृतदेह आढळून आला असून सेलू पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.

रवळगाव (ता.सेलू ) शिवारातील सेलू ते सातोना रेल्वे ट्रॅकवर पोल नंबर २४५/० या ठिकाणी एक मुलगी शनिवारी सकाळी धावणाऱ्या मालगाडीची धडक लागून मयत झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली. रेल्वे प्रशासनाने ही बाब सेलू ठाण्यात कळवली. त्यानंतर पोलिस निरिक्षक समाधान चवरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिसांचा घटनास्थळी पंचनामा केला. दरम्यान, या मुलीचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालय सेलूत आणण्यात आला आहे. ओळख पटविण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे.

मयत मुलीला डोक्या व्यतिरिक्त कुठेही मार नाही. त्यामुळे हा घातपात असू शकतो का..? आणखी काही प्रकार आहे..? या दृष्टीने पोलीस अधिक माहिती घेत आहेत. अधिक तपास पूर्ण झाल्यावर अधिक माहिती दिली जाईल असे पोलिस निरिक्षक समाधान चवरे यांनी सांगितले.

Web Title: Girl’s body found on the railway track, accident or suicide

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here