Home क्राईम लाजवणारी घटना! पतीला डांबून महिलेसोबत 11 जणांचं राक्षसी कृत्य

लाजवणारी घटना! पतीला डांबून महिलेसोबत 11 जणांचं राक्षसी कृत्य

Satara Crime: कारखान्याच्या मालकासह अन्य 10 जणांनी या महिलेवर बलात्कार (Rape) केल्याचा आरोप.

owner of the factory along with 10 other people accused of raping the woman

सातारा :महाराष्ट्राला लाज आणणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीला खोलीत डांबून कारखान्यात काम करणाऱ्या महिलेसोबत एक दोन नाही तर तब्बल 11 जणांनी राक्षसी कृत्य केल्याचे समोर आले आहे. या राक्षसी वृत्तीच्या कामगारांच्या तावडीतून पती आणि महिलेनं कशीबशी स्वत:ची सुटका केली आणि त्यानंतर रायगडला आले.

रायगडमध्ये आल्यानंतर या महिलेनं आणि तिच्या पतीनं आपल्या मामाला हा भयंकर प्रकार सांगितला आहे. त्यानंतर विरार पूर्व इथे पोलिसांनी पीडितेचं म्हणणं ऐकून घेतलं. आता सातारा पोलिसांनी या पीडित महिलेला जबाब नोंदवण्यासाठी आपल्यासोबत घेऊन गेले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित महिला 28 वर्षांची आहे. तिला तीन मुलं आहेत. ती पतीसोबत कोळसा खाणीत काम करायला गेली होती. हे कातकरी समाजातील असून रायगडमधील रहिवासी आहेत. पीडित महिला, तिचा नवरा आणि सासू सासरे आणि मुलं हे कोसळा खाणीत काम करतात.

ही धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील कोळसा खाणीत घडली आहे. 18 दिवसांपूर्वी कारखान्याच्या मालकासह अन्य 10 जणांनी या महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप तिने केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी महिलेची तक्रार नोंदवून घेण्यासाठी तिला साताऱ्याला पुन्हा नेलं आहे.

आरोपींनी पतीला खोलीत डांबून ठेवलं होतं. पीडित महिला आणि पतीने कशीबशी स्वत:ची सुटका करुन घेतली. तिथून पळ काढला. पीडित महिला आणि पती आपल्या मुलांसह रायगडला आले तेव्हा हा धक्कादायक प्रकार समोर आला. एवढंच नाही तर सासू सासऱ्यांचीही सुखरुप सुटका या कारखान्यातून करण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: owner of the factory along with 10 other people accused of raping the woman

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here