अल्पवयीन मुलीची परस्पर विक्री करून लावले लग्न; संशयित ताब्यात
Crime News: गतिमंद अल्पवयीन मुलीला फूस लावून जळगाव येथे नेत एका लाखात विक्री (Intermarriage of a minor girl) करत तीचे लग्न लावून देणाऱ्या संशयित महिलेसह दोघांवर घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
नाशिक | घोटी: करवंदे विक्रीसाठी आलेल्या गतिमंद अल्पवयीन मुलीला फूस लावून जळगाव येथे नेत एका लाखात विक्री करत तीचे लग्न लावून देणाऱ्या संशयित महिलेसह दोघांवर घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपीना पकडून अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, परदेशवाडी ( ता. इगतपुरी ) येथील माहेर असलेली महिला सुरेखा योगेश पाटील हिची करवंदे ( रानमेवा ) खरेदी करतांना एका अल्पवयीन गतिमंद मुलीची ( वय १७ वर्ष नऊ महिने ) ओळख झाली. तीला विश्वासात घेऊन तिच्या गतिमंद पणाचा फायदा उचलत सुरेखा पाटील ह्या महिलेने अल्पवयीन मुलीस सुरेखा पाटील हिचा पती योगेश शांताराम पाटील रा. कासोदा ता. एरंडोल जिल्हा जळगाव या दोघांच्या संगनमताने त्यांनी सदर मुलीस तिच्या घरच्यांना काही न सांगता अथवा संपर्क न करता तिला घोटी येथून जळगाव जिल्ह्यात कासोदा येथे नेत मनोज राजू शिंपी ह्यास एक लाख रुपयात विक्री करून कुठेही वाच्यता न करता एका घरात लग्न लावून दिले. तिच्यावर जबरदस्ती लैंगीक अत्याचार झाल्याने तिने त्यास विरोध करण्यासाठी सुरवात केली.
मात्र घरदाराचा पत्ता देखील तीला व्यवस्थित कोणाला सांगता येत नसल्याने तिच्यावर महिनाभर अनेकदा विविध त्रास वाट्याला येत असतांना वाच्यता करता सहनही होईना आणि सांगता येईना अशी अवस्था त्या मुलीची झाली होती. पीडित मुलगी बेपत्ता म्हणुन तिच्या घरच्यांनी अनेकदा तालुक्याचा परिसरात शोध घेतला होता. अखेर त्यांनी घोटी पोलीस ठाण्यात बेपत्ता तक्रार दाखल केली होती. यावरून नवनियुक्त पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून फूस लावून नेणाऱ्या महिलेची पार्शभूमी पाहता आपल्या गोपनीय खबऱ्या मार्फत अखेर त्या मुलीचा शोध लावून संशयित आरोपिंना शिताफीने अटक केली.
गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरु आतांनाच व पोलिसांपुढे रोजचे मंत्री मोहदय यांचे दौरे त्यातील पायलेटिंग, स्थानिक गुन्हे, कर्मचारी संख्याबळ कमी, पोलीस ठाण्याचा भौगलिक विस्तार मोठा आसल्याचा फायदा या सराईत महिलेने घेत पोलीस ठाण्यातून चहा पिण्याच्या नादात पळ काढला मात्र पोलिसाना तिला पुन्हा अटक करण्यात यश आले.
सदर संशयित आरोपी असलेल्या महिलेने या आधी अनेक तरुणांना विनयभंगाच्या खोट्या गुन्ह्यात अडकविले असल्याचे अनेक पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आल्यावर उघड झाले. अनेक लग्न देखील लावून दिल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी अधिक तपास घोटी पोलीस करीत आहे.
Web Title: Intermarriage of a minor girl Suspect in Custody
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App