Home अकोले वाकी ओव्हरफ्लो, कळसूबाईच्या पर्वतरांगांमध्ये मुसळधार सुरूच तर भंडारदरा पाणलोटक्षेत्रात ….

वाकी ओव्हरफ्लो, कळसूबाईच्या पर्वतरांगांमध्ये मुसळधार सुरूच तर भंडारदरा पाणलोटक्षेत्रात ….

Akole News: वाकी येथील लघु पाटबंधारे तलाव ओव्हरफ्लो (Waki overflow) झाला आहे.

Waki overflow, torrential rains continue in Kalsubai ranges and Bhandardara

अकोले: मुळा धरणात प्रथमच नवीन पाण्याची आवक सुरू झाली आहे. काल सकाळपर्यंत या धरणात 58 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले. 26000 दलघफू क्षमतेच्या धरणात काल सकाळी 9276 दलघफू पाणीसाठा झाला होता. 3822 क्युसेकने आवक सुरू आहे.

तीनचार दिवसांपूर्वी पाणलोटातून पाऊस गायब झाल्याने पाणलोटासह लाभक्षेत्रात चिंतेचे वातावरण होते. पण या भागातील नूर शुक्रवारपासून बदलला. रिपरिप सुरू असल्याने मुळा नदी 1000 क्युसेकने वाहत होती. पण शुक्रवारी रात्री पावसाचा जोर वाढल्याने कोतूळ येथील मुळा नदीचा विसर्ग 3822 क्युसेक होता.

वाकी येथील ११२ दलघफू क्षमतेचा लघु पाटबंधारे तलाव शुक्रवारी रात्री नऊ वाजता भरून वाहू लागला आहे. मुळा भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्राबरोबरच शिखर स्वामिनी कळसूबाईच्या पर्वतरांगांमध्ये मुसळधार सुरूच आहे. कृष्णावंती नदी भरून वाहू लागली त्यामुळे वाकी लघु पाटबंधारे तलाव भरून वाहू लागला आहे आणि या नदीवरील आता निळवंडे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होणार आहे.

वाकी येथील लघु पाटबंधारे तलाव भरून वाहू लागला असून या तलावाच्या भिंतीवरून ५५६ क्युसेकने पाणी प्रवरा पात्रात पडत आहे. निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाच्या सरी बरसत असल्याने आता निळवंडे धरणातील पाण्याची आवक वाढणार आहे. शनिवारी सकाळी या धरणात ८४ दलघफू नवीन पाण्याची आवक होत पाणीसाठा १ हजार ८७४ दलघफू झाला होता.

भंडारदरा धरण परिसरात होत असलेल्या या पावसामुळे भंडारदरा धरणातील पाण्याची आवक वाढत आहे. आहे. शनिवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासांत भंडारदरा धरणात ३८२ दलघफू नवीन पाण्याची आवक झाली तर दिवसभराच्या बारा तासांत ११२ दलघफू नवीन पाण्याची आवक होत पाणीसाठा ६ हजार ४६२ दलघफू झाला होता.

पाणलोटक्षेत्रात  २४ तासातील पाऊस

■ घाटघर १४५

■ रतनवाडी १५५

■ पांजरे १३०

■ भंडारदरा १३७

■ वाकी १२७

Web Title: Waki overflow, torrential rains continue in Kalsubai ranges and Bhandardara

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here