Home नागपूर मॅट्रीमोनी साईटवरील ओळखीतून तरुणीवर अत्याचार

मॅट्रीमोनी साईटवरील ओळखीतून तरुणीवर अत्याचार

Nagpur Crime News: मॅट्रोमोनी साईटवरून झालेल्या ओळखीतून लग्नाचे आमिष दाखवत एका तरुणीवर अत्याचार (abuse).

Abuse of young woman through acquaintance on matrimony site

नागपूर: मॅट्रोमोनी साईटवरून झालेल्या ओळखीतून लग्नाचे आमिष दाखवत एका तरुणीवर अत्याचार करणाऱ्या संशयित आरोपीचा आणखी एक गुन्हा समोर आला आहे. त्याने याच पद्धतीने एका 37 वर्षीय तरुणीवर देखील अत्याचार केल्याचे प्रकरण समोर आले आहे. राहुल उत्तमराव डाखोरे (33, रा. मोंढा, हिंगणा नाका) असे या संशयित आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अवघ्या काही दिवसांत त्याच्यावर दाखल झालेला हा सलग दुसरा गुन्हा आहे. धक्कादायक बाब म्हणजे या तरुणाचे लग्न झाले असून देखील त्याने विवाह संकेतस्थळावरून तरुणींची फसवणूक करत त्यांच्यावर अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून पुढील कारवाई सुरू केली आहे. सोबतच राहुलने आणखी कुणाची फसवणूक केली आहे का, याचा अधिक तपास देखील केला जात आहे.

कोराडी येथील रहिवासी असलेली एका विधवा महिलेशी राहुलने विवाह संकेतस्थळावरून संपर्क साधला. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी जवळीक साधली. दरम्यान, शारीरिक संबंध प्रस्थापित करून त्यात ही पीडित महिला गर्भवती झाली. राहुल हा विवाहित आहे. मात्र अविवाहित असल्याचे भासवून त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवत आपल्या जाळ्यात ओढले. त्याने महिलेशी जबरदस्ती करून वारंवार शारीरिक संबंध ठेवले. यामुळे महिला गर्भवती असल्याचे समोर आले. त्यानंतर ही बाब लक्षात येताच पीडित महिलेने याबाबत माहिती राहुलला दिली. मात्र याउलट राहुलने महिलेला धमकावून गर्भपात करण्यास भाग पाडले.

प्रकरण अंगाशी आल्यावर त्याने लग्नालाही नकार दिला. दरम्यान, राहुलने एमआयडीसीतील एका महिलेला अत्याचार करून तिच्याकडून पैसे आणि महागड्या भेटवस्तू घेतल्याचे महिलेला समजले. या प्रकरणी राहुलला अटक केल्यानंतर या महिलेने देखील पुढे येत कोराडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी राहुलविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. राहुलने अशा प्रकारे किती तरुणींची फसवणूक केली आहे का याबाबत पोलीस तपास करीत आहे.

Web Title: Abuse of young woman through acquaintance on matrimony site

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here