Home क्राईम सवतीच्या सांगण्यावरून जावयाकडून मुलीचा खून, स्वतःही घेतला गळफास

सवतीच्या सांगण्यावरून जावयाकडून मुलीचा खून, स्वतःही घेतला गळफास

Breaking News  Sangamner: पतीने पत्नीचा डोक्यात दगड घालून खून करून त्यानंतर, पतीने झाडाला गळफास घेतल्याची घटना, जावयासह दोन महिलांविरुद्ध गुन्हा.

Daughter-in-law killed by son-in-law on Savati's request, also Suicide

पुणे: पतीने पत्नीचा डोक्यात दगड घालून खून करून त्यानंतर, पतीने झाडाला गळफास घेतल्याची घटना रविवारी घडली होती. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. दरम्यान, मुलीच्या सवतीच्या सांगण्यावरून जावयाने मुलीचा दगडाने ठेचून खून केल्याची फिर्याद एका महिलेने दिली आहे.

सोमनाथ सखाराम वाघ (वय ५३, रा. वारजे माळवाडी) आणि त्याची पत्नी सुवर्णा सोमनाथ वाघ (वय ४२) अशी मृत पती- पत्नीची नावे आहेत. याबाबत सुवर्णाची आई ताराबाई बाळासाहेब इलग (वय ६०, रा. प्रतापपूर, आश्वी, ता. संगमनेर, जिल्हा अहमदनगर) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून मृत सोमनाथ वाघ याच्यासह दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक युसूफ शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, ताराबाई यांची मुलगी सुवर्णाचे सोमनाथ वाघ याच्याशी लग्न झाले होते. परंतु सोमनाथचे पहिले लग्न झालेले आहे. सुवर्णाची सवत आणि तिची मुलगी जावई सोमनाथला माझ्या मुलीबद्दल वाईट सांगत होते. त्या दोघींचे ऐकून जावई मुलीला बेदम मारहाण करीत होता. तर त्या दोघी मुलीला सारखे टोमणे मारत होते. त्या दोघींच्या सांगण्यावरून जावयाने सुवर्णाला मारहाण केली होती.

दरम्यान, जावयाने रविवारी सकाळी फिरायला जाण्याच्या बहाण्याने सुवर्णाला दुचाकीवरून वारजे कुडजे रस्त्यावरील कमळादेवी मंदिराचे पुढे, पिकॉक बे येथे नेले. तिथे रस्त्याच्या बाजूच्या झाडांमध्ये नेऊन दगडाने ठेचून तिचा खून केला. त्यानंतर त्याने झाडाला पॅन्टच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Daughter-in-law killed by son-in-law on Savati’s request, also Suicide

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here