अल्पवयीन विद्यार्थिनीवर वसतीगृहात अत्याचार; दोन अधीक्षक निलंबित
अदिवासी विकास प्रकल्पाच्या भुवन आश्रमशाळेतील वसतीगृहात अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार (abused) झाल्याची घटना उघडकीस.
पेठ | नाशिक: गेल्या आठवड्यापूर्वी तालुक्यातील अदिवासी विकास प्रकल्पाच्या भुवन आश्रमशाळेतील वसतीगृहात अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पेठ पोलीस ठाण्यात पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित अधीक्षक पसार झाला आहे. आदिवासी विकास विभागाने याप्रकरणी दोन अधीक्षकांना निलंबित केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शासकीय आश्रमशाळा भुवन येथे इ. ७ वीत शिकत असलेल्या विद्यार्थीनीस वार्षिक परिक्षा संपल्यानंतर मुलांच्या वसतीगृहाचे अधीक्षक राहुल सुरेश तायडे यांनी मुलींच्या वसतीगृहाच्या तिसऱ्या मजल्यावर बोलावून विद्यार्थिनीवर अत्याचार केले.
आश्रमशाळेच्या परिक्षा संपल्याने पिडीतेची आई तिला घेण्यासाठी आश्रमशाळेत आली. यावेळी पिडीतेने आपल्या आईला आपबिती सांगितली. याप्रकरणी पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अदिवासी विकास विभागाने नेमलेल्या सहा महिला सदस्सीय विशाखा समितीने भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर या समितीने दिलेल्या अहवालानुसार अधीक्षक राहुल तायडे आणि महिला अधीक्षक प्रियंका उके या दोषी आढळल्या. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त संदीप गोलाईत यांनी दिली आहे.
Web Title: abuse on minor student in hostel Two superintendents suspended
See Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App