Home क्राईम हॉटेल, लॉजमध्ये शरीरसंबंधासाठी तासाप्रमाणे रक्कम घेऊन देतात रूम! पोलिसांनी धाड टाकली अन…

हॉटेल, लॉजमध्ये शरीरसंबंधासाठी तासाप्रमाणे रक्कम घेऊन देतात रूम! पोलिसांनी धाड टाकली अन…

Yavatmal Crime: महाविद्यालयीन व शाळकरी विद्यार्थिनींवर अत्याचार (abused) झाल्याची घटना याप्रकरणी तपासात हॉटेल ग्यानसन्समध्ये अवैध कुंटणखानाच (prostitution) चालविला जात आहे. कारवाईत वेश्याव्यवसाय करणारी महिला ग्राहकासोबत रंगेहात सापडली.

  hotels, lodges, they charge an hourly amount for sexual intercourse, prostitution in Hotel

यवतमाळ: गेल्या काही दिवसांपासून यवतमाळातील अनेक हॉटेल्समध्ये प्रेमीयुगुलांचे ‘वास्तव्य’ वाढले आहे. यातून काही महाविद्यालयीन व शाळकरी विद्यार्थिनींवर अत्याचार झाल्याची बाब पुढे आल्यानंतर अवधुतवाडी पोलिसांनी सोमवारी सायंकाळी येथील बसस्थानक चौकात ट्रॅव्हल्स पॉईंटसमोरील हॉटेल ग्यानसन्सवर धाड टाकली. या कारवाईत व्यवसाय करणारी वारंगना, महिला व मुली पुरविणारा दलाल पोलिसांच्या हाती लागले. इतर रूमची झडती घेतली असता तीन प्रेमीयुगुलही नको त्या अवस्थेत आढळून आले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

शहरातील बहुतांश हॉटेलमध्ये लॉजिंगच्या नावाखाली जोडप्यांना खोली दिली जाते. महाविद्यालयीन, शाळकरी प्रेमीयुगुल तासाभराचे दोन ते तीन हजार रुपये मोजून या हॉटेलमध्ये रमतात. यातून अनेकदा गंभीर गुन्हे घडण्यासोबतच मुलींची फसवणूक होते. शहरातील गजबजलेल्या परिसरातील हॉटेल ग्यानसन्समध्ये अवैध कुंटणखानाच चालविला जात आहे. मात्र पोलिसांना याबाबत खात्री होत नव्हती. या हॉटेलमध्ये १५ फेब्रुवारीला राळेगाव तालुक्यातील तरुणाने एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केला. या प्रकरणात ५ एप्रिल रोजी अवधूतवाडी पोलिसांनी अर्पित संतोष दांडेकर (२८, रा. अंतरगाव) याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. तेव्हापासून हॉटेल ग्यानसन्सवर पोलिसांची नजर होती. सोमवारी बनावट ग्राहक पाठवून अवधुतवाडी ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांनी पंचांना सोबत घेऊन या हॉटेलमध्ये धाड टाकली.

या कारवाईत वेश्याव्यवसाय करणारी महिला ग्राहकासोबत रंगेहात सापडली. याच हॉटेलमध्ये काम करणारा आणि महिला, मुली पुरविणारा व्यवस्थापक पोलिसांच्या हाती लागला. त्याच्या मोबाइलमध्ये अनेक महिला, मुलींचे फोटो आढळून आले. शहरातील अनेक प्रतिष्ठीत त्याच्या संपर्कात असल्याचे मोबाइल तपासणीत पुढे आले आहे. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. त्यानंतर हॉटेलमधील इतरही रूमची झडती घेतली तेव्हा महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनी नको त्या अवस्थेत सापडले. यात तीन विद्यार्थी व तीन अल्पवयीन मुलींना ताब्यात घेतले. त्यांच्या पालकांना बोलावून सूचनापत्रावर सोडण्यात आले. व्यवसायासाठी आणलेल्या महिलेलाही सोडून देण्यात आले. हॉटेल व्यवस्थापक व दलाल म्हणून काम करणाऱ्या शिवम छगन पवार रा. संभाजीनगर, यवतमाळ याच्याविरुद्ध पिटा कायद्यानुसार गुन्ह दाखल केला आहे.

मुलामुलींची कुठलीही नोंद रजिस्टरमध्ये घेतली जात नाही. केवळ प्रेमीयुगुलांचे आधारकार्ड ताब्यात ठेवले जातात. नंतर रजिस्टरवर खोट्या नोंदी घेऊन ते मेन्टन केले जाते. हॉटेल ग्यानसन्समध्ये अवधूतवाडी पोलिसांनी धाड टाकल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याबाबत पोलिसांनी हॉटेल मालक जय वाधवाणी याच्याकडे विचारणा केली असता त्याने असा काही प्रकार चालतो याची माहितीच नसल्याचे सांगितले. विशेष म्हणजे पोलिसांनीही त्याच्यावर विश्वास ठेवला! हॉटेलचा व्यवस्थापक शिवम पवार याने गुन्हा कबूल केला, मात्र, मालकाला वाचविण्यासाठी त्याने सर्व आरोप स्वतःवर घेतल्याची चर्चा आहे. ही घटना उघडकीस आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

Web Title: hotels, lodges, they charge an hourly amount for sexual intercourse, prostitution in Hotel

See Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here