धक्कादायक घटना: उसने पैसे देऊन महिलेवर दोन वर्ष अत्याचार
Aurangabaad Rape Case: पीडितेच्या एकटेपणाचा फायदा घेत जबरदस्तीने शारिरीक संबंध (Abused) प्रस्थापित केले.
औरंगाबाद: शहरातील वाळूज परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीपासून विभक्त राहत असलेल्या महिलेवर तब्बल दोन वर्ष अत्याचार केल्याची घटना घडली आहे.
पीडित महिला पतीपासून विभक्त राहत असल्याचा फायदा घेत आरोपीने महिलेला 50 हजार रुपये उसने दिले. त्यानंतर सतत दोन वर्ष तिच्यावर अत्याचार केला.
याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तनवीर तसलीम शेख असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, 29 वर्षीय पीडित महिला पतीपासून विभक्त राहते. वाळूज एमआयडीसी येथील एका खाजगी कंपनीत काम करून ती आपला उदरनिर्वाह चालवते.
ऑक्टोबर 2020 मध्ये पीडित महिलेची ओळख तनवीर शेख सोबत झाली होती. त्यावेळी पैशाची चणचण भासत असल्याने पीडितेने आरोपीकडून 50 हजार रूपये उसने घेतले. आरोपीकडून 50 हजार रुपये उसने घेतले. पैशाच्या कारणावरून आरोपी हा नेहमी पीडितेच्या घरी येत जात होता.
आरोपीने पीडितेच्या एकटेपणाचा फायदा घेत जबरदस्तीने शारिरीक संबंध प्रस्थापित केले. तुला दिलेले उसने पैसे तू मला परत देऊ नको तू माझ्यासोबत राहा. असं म्हणत आरोपीने तब्बल २ वर्ष पीडितेचे लैंगिक शोषण केले.
याबाबत कुणाला सांगितल्यास आरोपीने पीडितेला जीवे मारण्याची धमकीही दिली. आरोपीचे कृत्य दिवसेंदिवस वाढत असल्याने पीडितेने पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली.
पीडित महिलेच्या तक्रारीवरून वाळूज पोलिसांनी आरोपी तनवीरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत.
Web Title: Abused a woman for two years by paying on a loan