Home अकोला चारित्र्याच्या संशयावरून डॉक्टरने केली गर्भवती पत्नीची हत्या- Murder

चारित्र्याच्या संशयावरून डॉक्टरने केली गर्भवती पत्नीची हत्या- Murder

Murder Case: मृतदेह डॉक्टर वाहनातून संशयास्पद स्थितीत फिरविताना आढळल्याने नागरिकांच्या सतर्कतेमुळे प्रकरण उघडकीस.

doctor murder his pregnant wife due to suspicion of character

पातूर/ खेट्री (अकोला) : चारित्र्याच्या संशयावरून गर्भवती पत्नीची डॉक्टर पतीने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना समर्थ नगरात घडली. आरोपी डॉक्टरला पातूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून, खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पत्नीचा मृतदेह डॉक्टर वाहनातून संशयास्पद स्थितीत फिरविताना आढळल्याने नागरिकांच्या सतर्कतेमुळे प्रकरण उघडकीस आले होते.

डॉ. राजेश भास्कर ठाकरे याने पत्नी वर्षा (३२) हिची गळा आवळून हत्या करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी १६ सप्टेंबर रोजी चोंढी गावात मृतदेह वाहनात नेला. आरोपी डॉक्टरने पत्नीचा खून केल्याची कबुली दिली आहे.

Web Title: doctor murder his pregnant wife due to suspicion of character

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here