Home अहमदनगर अहमदनगर: विवाहितेशी मैत्री करुन केला अत्याचार

अहमदनगर: विवाहितेशी मैत्री करुन केला अत्याचार

Breaking News | Ahmednagar: पतीसोबत वाद झाल्याने – काही दिवस अलिप्त राहणाऱ्या विवाहितेसोबत मैत्री करून बदनामी करण्याची धमकी देत तिच्यावर नगर शहरातील लॉजवर वारंवार अत्याचार (abused) केल्याचा प्रकार.

Abused by being friends with a married woman

अहमदनगर:  पतीसोबत वाद झाल्याने – काही दिवस अलिप्त राहणाऱ्या विवाहितेसोबत मैत्री करून बदनामी करण्याची धमकी देत तिच्यावर नगर शहरातील लॉजवर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. नवी मुंबई येथे राहणाऱ्या पीडितेने याप्रकरणी कामोठे (नवी मुंबई) पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा गुन्हा तपासकामी तोफखाना पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

सुरज कचरू कातोरे (वय २९ रा. नागापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. मुळची जामखेड तालुक्यातील तरुणीचा कर्जत तालुक्यातील तरुणासोबत विवाह झाला आहे. ते दोघे नवी मुंबई येथे राहत होते. दरम्यान त्यांच्यात वाद झाल्याने फिर्यादी मे २०२२ पासून माहेरी

जामखेड येथे राहत होत्या. त्यांच्या कॉलेजच्या मैत्रिणीच्या माध्यमातून त्यांची सुरज सोबत ओळख झाली होती. त्या ओळखीतून त्याने डिनरला जाण्याचे सांगून फिर्यादीला एका लॉजवर नेले. तेथे बळजबरीने अत्याचार केला. त्यानंतर सुरजने वारंवार बदनामी करण्याची धमकी देऊन फिर्यादीसोबत नगरमधील लॉजवर अत्याचार केला. नोव्हेंबर २०२३ मध्ये फिर्यादीचा पतीसोबत समेट झाल्याने ते नवी मुंबई येथे एकत्र राहू लागले. त्यानंतर देखील सुरजने फिर्यादीला सोशल मीडियावर मेसेज करून भेटण्यासाठी बोलविले. भेटायला आली नाही तर तुझ्या पतीला सर्व प्रकार सांगून बदनामी करेन, अशी धमकी दिली. शेवटी फिर्यादीनेच पतीला सर्व सांगितले व पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Abused by being friends with a married woman

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here