Home अहमदनगर अहमदनगर: बंदुकीचा धाक दाखवत लॉजवर नेऊन अत्याचार

अहमदनगर: बंदुकीचा धाक दाखवत लॉजवर नेऊन अत्याचार

Breaking News | Ahmednagar: दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला मुस्लिम समाजातील तरुणाने बंदुकीचा धाक दाखवत पुणे येथे पळवून नेत लॉजवर नेऊन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना.

Abused by taking to the lodge at gunpoint

श्रीगोंदा : तालुक्यातील पश्चिमेकडील एका गावातील इयत्ता दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला मुस्लिम समाजातील तरुणाने बंदुकीचा धाक दाखवत पुणे येथे पळवून नेत लॉजवर नेऊन अत्याचार केल्याप्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात पोक्सोसह अनुसूचित जमाती अत्याचर प्रतिबंध कायद्यान्वये पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने ४ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, तालुक्यातील पश्चिम भागात राहणारी व इयत्ता दहावीमध्ये शिकत असलेल्या अल्पवयीन मुलगी शिक्षणासाठी मामाकडे राहते. बेलवंडी येथील विद्यालयात दहावीचे पेपर असल्याने ती मामाच्या गावावरून पेपर देण्यासाठी येत असताना दि.२६ मार्च रोजी तिच्याच गावातील ओळखीच्या एका मुस्लिम तरुणाने तिला दुचाकीवर बसण्याचा आग्रह केला, त्यावेळी मुलीने दुचाकीवर बसण्यास नकार

दिला असता, मुस्लिम तरुणाने अल्पवयीन मुलीला पिस्तूल दाखवत तू जर माझ्या गाडीवर बसली नाही तर तुला पिस्तुलाने गोळ्या घालून जीवे मारण्याचा दम देत तिला बळजबरीने गाडीवर बसवले व शिरुर, जि. पुणे येथे नेले, तेथून बसने पुणे येथे घेऊन गेला. पुणे येथे एका लॉजवर रात्री १० वा. च्या सुमारास तिच्यावर तिच्या इच्छेविरुध्द बळजबरीने अत्याचार केला. दि.२८ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास हा तरुण अल्पवयीन मुलीला नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे येथील त्याच्या आज्जीच्या घरी घेऊन गेला. तरुणाच्या आज्जीने दोघांना बेलवंडी पोलीस ठाण्यात हजर केले.

Web Title: Abused by taking to the lodge at gunpoint

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here