धक्कादायक! एकतर्फी प्रेमातून भररस्त्यात अल्पवयीन मुलीवर कोयत्याने हल्ला
Breaking News | Pune Crime: एका अल्पवयीन तरुणीवर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर.
पुणे: पुण्यात एका अल्पवयीन तरुणीवर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा सीसीटिव्ही व्हिडिओ समोर आला आहे. पुण्यातील सदाशिव पेठेत झालेल्या घटनेची पुनरावृत्ती टळली आहे.
इयत्ता ११वी मध्ये शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीवर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून भररस्त्यात अडवत कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मुलगी बोलत नसल्याच्या रागातून हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. नागरिकांनी आरडा-ओरडा केल्यानंतर दुचाकीवरून आलेले दोन २ तरुणांनी पळ काढला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. खडक पोलीस ठाण्यात महेश सिद्धप्पा भंडारी आणि त्याच्यासोबत असलेल्या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक मिळालेली माहिती अशी की, महेश आणि अल्पवयीन मुलगी हे दोघे ही एकमेकांना ओळखतात. दरम्यान मुलगी व तिच्या तीन मैत्रिणी दुपारी सुभाषनगर येथील गल्ली क्रमांक ६ येथून जात होत्या. यादरम्यान महेश व त्याचा मित्र येथे आले. महेशकडे कोयता होता त्याने झालेल्या वादातून त्या मुलीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र तिथे असलेल्या नागरिकांनी हे पाहताच आरडा ओरड केली आणि या तरुणांनी तिथून पळ काढला
अल्पवयीन मुलीकडून अद्याप पोलिसात तक्रार देण्यात आलेली नसली तरी सुद्धा पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली असून गुन्हा दाखल केला आहे. काही महिन्यांपूर्वी पुण्यातील सदाशिव पेठेत पेरुगेट पोलीस चौकीजवळ एका तरुणीवर एकतर्फी प्रेमातून कोयत्याने वार करण्याचे प्रयत्न झाला होता. त्या घटनेची पुनरावृत्ती टळली आहे.
Web Title: One Side love attack on girl
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study