Home अहमदनगर अहमदनगर: शिवसेनेचे संपर्कप्रमुखाविरोधात अत्याचाराचा गुन्हा

अहमदनगर: शिवसेनेचे संपर्कप्रमुखाविरोधात अत्याचाराचा गुन्हा

Breaking News | Ahmednagar: शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख यांच्याविरूध्द अत्याचाराचा गुन्हा दाखल.

abused case against Shiv Sena contact chief

अहमदनगर: येथील शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख सचिन तुकाराम जाधव (रा. कोंड्यामामा चौक, मंगलगेट) यांच्याविरूध्द अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिलेने कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून सप्टेंबर २०२० पासून आजपर्यंत केडगाव व प्रोफेसर कॉलनी चौक येथे ही घटना घडली. फेसबुकवर झालेल्या मैत्रीचा व फिर्यादीच्या मागे कोणी नाही, याचा फायदा घेऊन सचिन जाधव याने केडगाव येथील भूषणनगर व प्रोफेसर चौकातील फ्लॅटवर येऊन फिर्यादीच्या संमतीशिवाय शारीरिक संबंध ठेवले. तसेच, मोबाईलमधील फोटो व्हायरल करण्याची, फिर्यादीच्या मुलाला ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक महेश जानकर करत आहेत.

Web Title: abused case against Shiv Sena contact chief

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here