संगमनेर: बिबट्याचा थरार! दुचाकीवर रात्री प्राणघातक हल्ला; दोघेजण गंभीर
Breaking News | Sangamner: रात्रीच्या वेळी मोटारसायकलवरून जाणाऱ्या दोघांवर बिबट्याने प्राणघातक हल्ला करुन गंभीर जखमी.
संगमनेर: रात्रीच्या वेळी मोटारसायकलवरून जाणाऱ्या दोघांवर बिबट्याने प्राणघातक हल्ला करुन गंभीर जखमी केले. तालुक्यातील मालदाडच्या शिवारात हा थरार बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडला.
संजय नवले (४९, रा. मालदाड) व संतोष पाटील (३४ दोघेही रा. मालदाड) अशी जखमींची नावे आहेत. दोन्ही जखमींना घुलेवाडी येथे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. वन विभागाच्या माहितीनुसार मालदाड शिवारातून दोघे रात्री ९ वाजेच्या सुमारास मोटारसायकलवरून जात होते. यावेळी भक्ष्याच्या शोधात मालदाड घुलेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर फरशीजवळ मक्याच्या शेतात बिबट्या दबा धरुन बसलेल्या बिबट्याने दुचाकीवर झेप घेत संजय नवले यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्याने घाबरलेले नवले यांनी प्रतिकार करण्याच्या आत त्यांच्या डाव्या पायाला पंजा मारुन ओरखडून जखमी केले. यानंतर बिबट्याने संतोष पाटील यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या उजव्या हाताला ओरखडल्याने ते जखमी झाले. दोघांनी आरडा ओरड केल्याने आसपासचे नागरिक मदतीस धावल्याने बिबट्याने धूम ठोकली. हल्ल्यात जखमी झालेल्या दोघांचा मोठा रक्तस्त्राव झाला.
Web Title: thrill of the Bibatya Assault on two-wheeler at night Both are serious
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study