Home अहमदनगर श्रीरामपूर: रेल्वे मार्ग ओलांडताना रेल्वेखाली तरुण ठार

श्रीरामपूर: रेल्वे मार्ग ओलांडताना रेल्वेखाली तरुण ठार

Breaking News | Ahmednagar Accident: रेल्वेखाली सापडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर.

youth was killed under the train while crossing the railway line

श्रीरामपूर : रेल्वेखाली सापडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.  दौंड-मनमाड मार्गावर पढेगाव स्थानकाजवळ रेल्वे मार्ग ओलांडताना सुनील बापू हुके (वय ३२) हा चक्कर आल्याने कोसळला. त्याचवेळी आलेल्या रेल्वेखाली सापडून तो मृत्युमुखी पडला.

पढेगाव येथील इंदिरानगर परिसरात हुके राहत होता. गुरुवार पहाटेच्या वेळेस तो रेल्वेमार्ग ओलांडून चालला होता. त्यावेळी भोवळ येऊन रुळावर पडला. काही वेळाने त्या रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या रेल्वेखाली सापडून तो जागीच मरण पावला, सकाळी स्थानिकांना त्याचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास करत आहेत. सुनील हुके हा मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होता.

Web Title: youth was killed under the train while crossing the railway line

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here