Home औरंगाबाद Accident:  भयंकर! बस आणि बोलेरो पिकअपचा भीषण अपघातात  ७ जण जागीच ठार

Accident:  भयंकर! बस आणि बोलेरो पिकअपचा भीषण अपघातात  ७ जण जागीच ठार

accident 7 killed in bus and bolero pickup crash

Aurangabad | औरंगाबाद: जालना मार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. बस आणि बोलेरो पिकअप गाडीची धडक झाली असून या भीषण अपघातात (Accident) सात जण जागीच ठार झाल्याची माहिती मिळत आहे. औरंगाबाद-जालना मार्गावर गाढेजळगाव फाट्याजवळ हा अपघात घडला आहे. बस आणि बोलेरो पिकअपची धडक इतकी भीषण होती की, या अपघातात बोलेरो गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.

या गाडीच्या समोरील भाग अक्षरश: चुराडा झाला आहे. या भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती समजताच करमाड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. मदतकार्य सुरु असून जखमींना औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

Web Title: accident 7 killed in bus and bolero pickup crash

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here