अहमदनगर: बारवेत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ
Ahmednagar | Rahuri | राहुरी: राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा शहरातील शनिमंदिर लगत असलेल्या बारवेत बुधवारी सायंकाळी आंबी रोड येथील चर वस्ती येथे अशोक उर्फ बाळू नाना पाळंदे यांचा मृतदेह (Dead body) आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह बारवेच्या बाहेर काढण्यात आला. यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. आंबी रोड चरवस्ती येथील रहिवासी व सेन्टरिंग काम करणारे अशोक उर्फ बाळू नाना पाळंदे वय ४० हे रविवारी सकाळी घरच्यांना गावातून जाऊन येतो असे सांगून गेले मात्र ते घरी आलेच नाहीत. घरातील मंडळीनी सर्वत्र शोध घेतला मात्र कोठेही मिळून आले नाही. दरम्यान बुधवारी त्यांचा मृतदेह आढळून आला.
Web Title: sensation was the discovery of a Dead body in the bar