Home Accident News Accident: आयशर ट्रक आणि ट्रक यांच्यात समोरासमोर अपघात

Accident: आयशर ट्रक आणि ट्रक यांच्यात समोरासमोर अपघात

Accident A head-on collision between an Eicher truck 

कर्जत | Accident: नगर – सोलापूर चापडगाव शिवारात दोन वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत माहिती अशी की, आयशर ट्रक सोलापूरकडुन नगरकडे जात असताना दुसरा ट्रक नगरकडुन सोलापूरकडे चालला होता. सोलापूरकडे जाणा-या ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने त्याने समोरुन येणा-या आयशर ट्रकवर जोरदार धडक देऊन त्यालाही सोलापूरच्या दिशेने 100 फुट फरपटत ओढीत नेले. यात आयशरमधील गंभीर मार लागला आहे.

चापडगावच्या युवकांनी चालकाला 108 रुग्णवाहिका बोलावून नगर येथे उपचारासाठी पाठवण्यात आले. यामध्ये इतर प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Web Title: Accident A head-on collision between an Eicher truck 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here