Home अहमदनगर Murder: धककादायक: मुलांनीच केली बापाची हत्या

Murder: धककादायक: मुलांनीच केली बापाची हत्या

Nevasa children murder his father

नेवासा | Murder: अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात धककादायक घटना समोर आली आहे. सकाळच्या वेळी प्रात:र्विधीसाठी शेतात गेलेल्या वृद्ध वडिलांची त्याच्या दोघा मुलांनी धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना तालुक्यातील कारेगाव येथे घडली आहे याबाबत दुसऱ्या पत्नीच्या फिर्यादीवरून तिच्या दोघा सावत्र मुलांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सुनिता उर्फ शालनबाई लक्ष्मण लोणारे (वय 36) धंदा-शेती रा. कारेगाव ता.नेवासा यांनी फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीत म्हटले आहे की 17 सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता माझे पती लक्ष्मण दादा लोणारे (वय 71) हे कारेगाव येथे आमच्या शेतात प्रातर्विधीसाठी गेले होते. माझ्या सवतीची मुले भाऊसाहेब लक्ष्मण लोणारे व अशोक लक्ष्‍मण लोणारे दोन्ही रा. रांजणगाव ता. नेवासा यांनी जुन्या शेतीच्या वादातून धारदार हत्याराने माझ्या पतीच्या डोक्‍यात व हातावर वार करून गंभीर दुखापत करून जीवे ठार मारले. या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहे. 

Web Title: Nevasa children murder his father

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here