Home Accident News Accident: भरधाव एसटीने तिघा मित्रांना चिरडले, तिघे ठार

Accident: भरधाव एसटीने तिघा मित्रांना चिरडले, तिघे ठार

Pune Accident: लोणंद नीरा रस्त्यावर भीषण अपघात झाल्याची घटना, एका भरधाव एसटीने दिलेल्या धडकेत तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला.

Accident Bhardhav ST crushed three friends, three were killed

पुणे: लोणंद-नीरा रस्त्यावर आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. एका भरधाव एसटीने दुचाकीवरुन जाणाऱ्या तिघा मित्रांना जोरदार धडक दिली.  लोणंद-नीरा रस्त्यावर आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. हे तिघे तरुण पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील पिंपरे आणि थोपटेवाडी येथील आहे. तिन्ही तरुण हे आई-वडिलांना एकुलते एक असल्याने तिन्ही कुटुंबियांवर दुख:चा डोंगर कोसळला आहे.

ओकांर संजय थोपटे, पोपट अर्जुन थोपटे आणि अनिल नामदेव थोपटे (सर्व रा. पिपंरे खुर्द ता. पुरंधर) असे या अपघात ठार झालेल्यांची नवे आहेत.  मिळालेल्या माहितीनुसार, लोणंद-निरा रोडवर लोणंदपासून दोन किलोमीटर अंतरावरीलल रेल्वे उड्डाणपुलाजवळ मंगळवेढाहून पुण्याकडे निघालेली एसटी बस क्रमांक एम एच २० बी एल ४१५८ ही निरेकडून लोणंदला जात होती.

यावेळी वरील तिघे हे मोटरसायकल वरून जात होते. या बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकीचा चक्काचूर झाला. या अपघात तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर पीएसआय गणेश माने व त्यांचे सहकार्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली.

अपघातातील वाहने बाजूला करून मृतदेह लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. या ठिकाणची वाहतूक पोलिसांनी सुरळीत केली. या गुन्ह्याची नोंद रात्री उशिरा लोणंद पोलीस स्टेशनमध्ये करण्यात येत होती. संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

Web Title: Accident Bhardhav ST crushed three friends, three were killed

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here