Home अहमदनगर नेवाशाच्या युवतीवर संगमनेरच्या तरूणाकडून अत्याचार

नेवाशाच्या युवतीवर संगमनेरच्या तरूणाकडून अत्याचार

Ahmednagar Crime: एका गावातील युवतीवर संगमनेर येथील एका तरुणाने नगर शहरातील हॉटेलमध्ये अत्याचार (abused) केल्याची घटना.

girl from Nevash was abused by a young man from Sangamner

अहमदनगर:  नेवासा तालुक्यातील एका गावातील युवतीवर संगमनेर येथील एका तरुणाने नगर शहरातील हॉटेलमध्ये अत्याचार केल्याची घटना शनिवारी (दि. 8) घडली. पीडित युवती व तरुणाची पूर्वीची ओळख होती. त्या ओळखीचा फायदा घेत तरूणाने तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले आहे.

पीडित युवतीने याप्रकरणी शनिवारी रात्री तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तरूणाविरूध्द अत्याचार व अ‍ॅट्रोसिटी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर पटेल शेख (रा. मालदाड रोड, तिरंगा चौक, संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याला तोफखाना पोलिसांनी रात्रीतून ताब्यात घेत अटक केली आहे. फिर्यादी युवतीची ओळख शेख सोबत 2019 मध्ये झाली होती.

युवती दोन आठवड्यापासून नगर शहरात राहत होती. तिचे क्लास सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी ती नेवासा तालुक्यातील तिच्या गावी गेली होती. दरम्यान समीरसोबत ओळख असल्याने ती त्याला भेटण्यासाठी शनिवारी नेवासा येथून बसने नगरमध्ये आली. समीरने तिला तारकपूर बस स्थानकावरून घेतले व ते दोघे शहरातील एका हॉटेलमध्ये गेले. तेथील रूममध्ये समीरने युवतीवर बळजबरीने अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.

Web Title: girl from Nevash was abused by a young man from Sangamner

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here