वादळी वाऱ्याने सभामंडपावर झाड कोसळून सात भाविक ठार, ४० जखमी
कडुनिंबाचे झाड सभामंडपावर कोसळले. या मंडपाखाली दबून सात भाविकांचा मृत्यू झाला, तर ४० जण जखमी.
अकोला: बाबूजी महाराज संस्थानात आयोजित दुःख निवारण कार्यक्रमासाठी रविवारी रोजी भाविक एकत्र आले होते. दरम्यान, सायंकाळी ७:३० सोसाट्याचा वाजताच्या सुमारास वारा कडुनिंबाचे झाड सभामंडपावर कोसळले. या मंडपाखाली दबून सात भाविकांचा मृत्यू झाला, तर ४० जण जखमी झाले. जखमींपैकी पाच जण गंभीर असल्याची माहिती आहे.
पारस येथील बाबूजी महाराज संस्थान येथे दर रविवारी भाविक दर्शनासाठी येतात. या ठिकाणी रात्री १० वाजता ‘दुःख निवारण’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारीही मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. कार्यक्रमाची तयारी सुरू असताना अचानक वादळी वारा सुटला आणि कडुनिंबाचे झाड मंडपावर कोसळले. त्याखाली दबल्याने तीन पुरुष व चार महिला ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत मृतांची ओळख पटू शकली नाही.
या घटनेची माहिती कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. ग्रामस्थांनी जखमी भाविकांना बाहेर काढून उपचारार्थ रुग्णालयात रवाना केले. रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते. बाळापूर पोलिस घटनास्थळी पोहोचले असून, बचावाचे कार्य सुरु होते.
Web Title: Seven devotees were killed and 40 injured when a tree fell on the assembly hall
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App