Home Accident News विचित्र अपघातात डोळ्यासमोर पोटच्या दोन्ही लेकरांचा मृत्यू, आई-वडीलही जखमी

विचित्र अपघातात डोळ्यासमोर पोटच्या दोन्ही लेकरांचा मृत्यू, आई-वडीलही जखमी

Nashik: पिकअप आणि दुचाकीच्या या अपघातात (Accident) बहिण भावांचा मृत्यू झाल्याची घटना.

accident, both the stomachs died in front of their eyes

नाशिक: नाशिक जिल्ह्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.  जिल्ह्यातील वणी पिंपळगाव रोडवर एका विचित्र अपघात घडला. या अपघातात दोन ठार तर तीन जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी रात्री एक वाजेच्या सुमारास घडली आहे. पिकअप आणि दुचाकीच्या या अपघातात बहिण भावांचा मृत्यू झाला आहे. आपल्या आई-वडिलांसमोरच त्यांच्यापासून या भावंडांना हिरावून घेतले आहे. या दुर्दैवी अपघाताने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिकप वाहन क्रमांक ( एम. एच. 16 डिके 7737) आणि पॅशन प्रो दुचाकी क्रमांक ( एम. एच. 15 एचडी 3034) यांच्यात अपघात झाला. दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील आणि बाजूला उभे असलेले इसम ही जखमी झाले. दरम्यान या अपघातात ओझर येथील 15 वर्षीय साहिल सुनील शिरसाट आणि 12 वर्षीय स्नेहल सुनील शिरसाठ हे दोघे बहिण भाऊ अपघातात ठार झाले आहेत. त्यांचे आई वडील सुनील बापू शिरसाट ( वय 40 ) आणि सोनाली सुनील शिरसाट ( वय 35 ) हे जखमी झाले.  याशिवाय रमणाबाई अप्पा खवळे ( वय 50 ) ही महिला देखील अपघातात जखमी झाली आहे.

अपघातानंतर जखमींना नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करिता दाखल करण्यात आले आहे. तर या अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्या मृतांचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या अपघाताप्रकरणी गोकुळ रामहरी शेळके ( वय 30 ) राहणार बोराळे तालुका चांदवड, नाशिक यसा वणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Web Title: accident, both the stomachs died in front of their eyes

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here