Home क्राईम संगमनेरातील चार बँकांना सहा कोटींहून अधिक रुपयांना गंडा घालणारा सराफ मोकाटच

संगमनेरातील चार बँकांना सहा कोटींहून अधिक रुपयांना गंडा घालणारा सराफ मोकाटच

Sangamner News: सहा कोटींहून अधिक रुपयांना फसविणारा गोल्ड व्हॅल्यूअर अद्यापही फरारच (absconding), पोलिसांच्या तपासाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित आहे.

old valuer who cheated more than six crore rupees is still absconding

संगमनेर:  शहरातील नामांकित चार बँकांच्या शाखांना सहा कोटींहून अधिक रुपयांना फसविणारा गोल्ड व्हॅल्यूअर अद्यापही फरारच आहे. तो सापडत नसल्याच्या सबबीमुळे पोलिसांच्या तपासाबाबत प्रश्नचिन्ह होत आहे.

शहरातील या सराफाने चार बँकांची फसवणूक केल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. सोन्याची तपासणी केली असता बनावट दागिने तारण ठेवल्याचे निष्पन्न झाले होते. नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक, जी.एस.महानगर बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक व प्रवरा बँक या मोठ्या बँकेमध्ये हा प्रकार उघडकीस आला होता. या चार बँकांना तब्बल सहा कोटींहून अधिक रुपयांचा चुना या भामट्याने लावला आहे.

त्याने 196 कर्जप्रकरणांमधून 6 कोटी 10 लाख 12 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. त्याच्यावर फसवणुकीचे चार गुन्हे दाखल झालेले आहेत.

महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये हा प्रकार उघडकीस आल्यानंतर इतर तीन बँकाचाही असाच प्रकार झाल्याचे स्पष्ट झाले. नाशिक मर्चंट को- ऑपरेटीव्ह बँकेत त्याने 136 जणांच्या संगनमताने तब्बल 4 कोटी 20 लाख 15 हजार रुपयांचे सोने तारण ठेवून त्या बँकेची फसवणूक केली. जी.एस.महानगर को-ऑपरेटिव्ह बँकेत 82 लाख 57 हजार रुपये व प्रवरा सहकारी बँकेतील आठ प्रकरणांमधून 38 लाख 44 हजार रुपयांची फसवणूक केली आहे.

संगमनेरच्या आर्थिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक घोटाळा उघडकीस होऊनही पोलिसांनी मात्र अद्यापही या प्रकरणाचा गांभीर्याने विचार केलेला नाही. हा सराफ अद्यापही मोकाटच आहे. पोलिसांनी त्याला अटक न केल्याने याबाबत उलट-सुलट चर्चा होत आहे.

Web Title: old valuer who cheated more than six crore rupees is still absconding

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here