अहमदनगर: पुलावरील कठडा तोडून कार खाली कोसळली
Ahmadnagar Accident News: कार पुलावरील कठडा तोडून खाली कोसळल्याची घटना.
अहमदनगर: नगर पुणे महामार्गावर कामरगाव ता. नगर शिवारात स्माईल स्टोन हॉटेलजवळ भरधाव वेगातील कार पुलावरील कठडा तोडून खाली कोसळल्याची घटना घडली आहे. सकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.
या अपघातात एकाच कुटुंबातील दोन लहान मुलांसह पाच जण जखमी झाले असून त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. त्या सर्वांवर नगरमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अपघातात जखमी झालेले कुटुंब मुळचे अमरावती येथील राहणारे आणि नोकरीनिमित्त पुणे येथे स्थानिक असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांची नावे समजू शकली नाही. हे कुटुंब पुण्याहून अमरावतीकडे जात होते. सकाळी 6 च्या सुमारास कामरगाव शिवारात स्माईल स्टोन हॉटेल जवळ असलेल्या वळणावर कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार पुलाच्या कठड्याला जोरात धडकली. त्यात पुलाचा कठडा तुटला व कार पुलावरून खाली 20 ते 25 फुट कोसळली. सुदैवाने पुला खाली झाडे झुडुपे असल्याने कार त्यांना अडकत खाली जावून आदळली.
Web Title: Accident car broke the embankment of the bridge and fell down