Home Accident News धक्कादायक! कार धरणात कोसळून बुडाली, तरुणीसह तिघांचा मृत्यू

धक्कादायक! कार धरणात कोसळून बुडाली, तरुणीसह तिघांचा मृत्यू

Pune News:  पाण्यात कार कोसळून भीषण अपघात (Accident) झाल्याची धक्कादायक घटना घडली असून या अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला.

Accident Car plunges into dam and drowns, three dead including young woman

पुणे: पुण्यातील नीरा देवघर धरणाच्या पाण्यात कार कोसळून भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली असून  या अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला असून एक जण बचावला आहे. पुण्याहून वरंधघाट मार्गे कोकणात जाणाऱ्या मार्गावर ही घटना घडली. अपघातात मृत्यू झालेले सर्वजण पुण्यातील असल्याचे माहिती मिळत आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, पुण्यातील रावेत येथून चार जण फिरण्यासाठी निघाले होते. तेव्हा भोर तालुक्यातील निरादेवघर धरण मार्गाने महाडकडे जात असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला. धुके  आणि पाऊस असल्याने रस्त्याचा अंदाज न आल्याने वळणावर गाडी 200 फूट उंचीवरून धरणाच्या पाण्यात पडली.

अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून एक जण बचावला आहे. अपघातातून बचावलेल्या तरुणाचे नाव संकेत जोशी वय 26, रा. बाणेर असं आहे. तर  अक्षय रमेश धाडे, स्वप्निल शिंदे आणि तरुणी हरप्रित यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच सह्याद्री रेस्क्यू फोर्स भोईराज जल आपत्ती व्यवस्थापन यांच्या मदतीने पोलीसांनी दोन मृतदेह बाहेर काढले आहेत. तर आणखी एका मृत व्यक्तीचा शोध सुरू आहे.

Web Title: Accident Car plunges into dam and drowns, three dead including young woman

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here