Home Accident News राजूर: कोल्हार घोटी रस्त्यावर कार ओढ्यात वाहून गेली, दोन मृतदेह आढळले

राजूर: कोल्हार घोटी रस्त्यावर कार ओढ्यात वाहून गेली, दोन मृतदेह आढळले

Akole Rajur News Accident: सदर अपघात हा रात्री अंधारात साडे आठ वाजेच्या सुमारास घडला. 

Accident Car washed away in stream on Kolhar Ghoti road, two dead bodies found

राजूर: अकोले तालुक्यातील कोल्हार घोटी रस्त्यावर वारांघुशी फाट्याजवळील ओढ्यात कार वाहून गेल्याची घटना शुक्रवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातातील दोन मृतदेह पोलिसांना आढळून आले तर तिसरा व्यक्ती वाहून गेल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

वाहनातील एकजण काच फोडून बाहेर आल्याने तो वाचला. मात्र तो घाबरलेला असल्याने त्याला बोलता येईना. त्यामुळे मृतांची नावे कळू शकली नाहीत. मृत दोघे हे औरंगाबाद येथील असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दुर्घटना दुर्गम भागात घडल्याने व रात्रीची वेळ असल्याने या घटनेची माहिती देण्यास स्थानिकांही अडचणी आल्या. माहिती समजताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. कारमधील दोन मृतदेह बाहेर काढून राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात येत आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान अकोले तालुक्यात पाणलोटक्षेत्रात पाउस सुरु असून ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहे. पाऊस चांगल्या प्रमाणात झाल्याने पर्यटकांची वर्दळ या भागात सुरु झाली आहे.

Web Title: Accident Car washed away in stream on Kolhar Ghoti road, two dead bodies found

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here