Home अकोले अगस्ती साखर साखर कारखाना निवडणुकीला खो, निवडणूक पुढे ढकलली

अगस्ती साखर साखर कारखाना निवडणुकीला खो, निवडणूक पुढे ढकलली

Ahmednagar Akole Agasti Sugar Sugar Factory the election postponed : निवडणूक कार्यक्रमाला 30 सप्टेंबरपर्यंत खो बसणार.

Akole Agasti Sugar Sugar Factory the election postponed 

अहमदनगर: राज्यातील अतिवृष्टी व पूर स्थिती यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून त्याचा परिणाम वाहतुकीवर होणार असून त्यामुळे राज्य आपत्ती व्यवस्थापन यांच्या अहवालानुसार राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका या आहे त्या टप्प्यावर थांबवून त्या ३० सप्टेंबर पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

सध्या नगर जिल्ह्यात अकोल्यात अगस्ती कारखान्यांचा निवडणूक कार्यक्रम आणि जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचा कार्यक्रम सुरू असून त्याला 30 सप्टेंबरपर्यंत खो बसणार असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली.

यामध्ये  अगस्ती साखर कारखांन्यासाठी येत्या रविवारी म्हणजे उद्या मतदान होणार होते. यासाठी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी मतदान पत्रिका देखील छापून तयार आहेत. अशात निवडणूक पुढे ढकलण्याच्या निर्णयामुळे सर्वांना जोरदार झटका असणार आहे.

तसेच जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेसाठी येत्या 24 तारखेला मतदान होणार असून यासाठी सध्या शिक्षकांचा  जोरदार प्रचार सुरू असतांना दोन महिने मतदान प्रक्रिया पुढे जाणार असल्याने शिक्षकांचा चांगलाच हिरमोड होणार आहे.

Web Title: Akole Agasti Sugar Sugar Factory the election postponed 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here