Home Accident News शाळेतून घरी निघालेल्या चिमुकलीचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू

शाळेतून घरी निघालेल्या चिमुकलीचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू

Aurangabad Accident: शाळेतून घरी निघालेल्या एका १३ वर्षीय चिमुकलीचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू.

Accident child who was going home from school was crushed to death by a tractor

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड तालुक्यात शाळेतून घरी निघालेल्या एका १३ वर्षीय चिमुकलीचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. कन्नड तालुक्यातील पाणपोई फाट्याजवळ घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, श्रद्धा पिंपळे ही शाळेतून घरी जाण्यासाठी सायकलवर निघाली होती. तिचा ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना कन्नड तालुक्यातील पाणपोई फाट्या नजीक काल सायंकाळच्या सुमारास घडल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली.

श्रद्धा पिंपळे ही 13 वर्षाची हाेती. ती सातवीत शिकत होती. पाणपोई फाट्या जवळील बनशेंद्रा शिवारातील बहिरगाव डोणगाव रोडवर शाळेतून सायकलवर घरी जात असताना श्रद्धा ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झाली.

तिला उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे तिच्या कुटुंबियांना आघात झाला आहे. श्रद्धाच्या मृत्यूनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Accident child who was going home from school was crushed to death by a tractor

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here