Home क्राईम प्रेमसंबधातून प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीची केली हत्या, कट रचला मात्र  

प्रेमसंबधातून प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीची केली हत्या, कट रचला मात्र  

Chandrapur Murder Case: प्रियकर व पत्नीने उशीने तोंड दाबून पतीची हत्या.

wife Murder her husband with the help of her lover

चंद्रपूर: चंद्रपूर शहरात प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकराच्या (Lover) मदतीने पत्नीने आजारी असलेल्या पतीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील बालाडी वार्ड या घनदाट वस्तीत राहणाऱ्या मनोज रासेकर यांच्या पत्नीचे स्वप्निल गावंडे नामक शिक्षकाशी प्रेमसंबंध होते. यात वारंवार आजारी राहणारा पती अडसर ठरत होता. पतीचा काटा काढण्यासाठी दोन्ही आरोपींनी कट रचला. कटाप्रमाणे रात्रीच्या सुमारास घराचे दार मोकळेच ठेवले गेल्याने आरोपी शिक्षक-प्रियकर घरात शिरला. त्याने उशीने तोंड दाबून पतीची हत्या (Murder) केली. आरडाओरडा झाल्याने दुसऱ्या खोलीत असलेली मनोजची आई घटनास्थळी पोहोचली.

मनोजची आई घटनास्थली आल्याने आरोपींनी प्लॅन ‘बी’ वापरत घटनेला लुटीचे स्वरुप दिले. घरातल्या कपाटातील सोने आणि वृद्ध आईच्या गळ्यातील सोन्याची पोत देखील शिक्षक आरोपीने धमकावून लांबवत घरातून पळ काढला. त्यानंतर सकाळी पत्नीने चोरी व मृत्यूबाबत पोलिसांत तक्रार दिली.

पोलिसांनी संपूर्ण घटनाक्रम समजून घेत मोबाईल कॉल डिटेल्स व गुप्त माहितीच्या आधारे आरोपींची ओळख पटविली. या हत्येच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपी शिक्षक चंद्रपुरातील नामांकित शाळेत शिक्षक आहे. आपल्या पतीचा आजारपणात मृत्यू झाला. असा एकूण कट पत्नीने रचला होता. मात्र, तो असफल ठरला.

Web Title: wife Murder her husband with the help of her lover

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here