Home पुणे कंटेनरने ४८ वाहनांना उडविले : चालक फरार, ५० हून अधिक जखमी

कंटेनरने ४८ वाहनांना उडविले : चालक फरार, ५० हून अधिक जखमी

Accident: भूमकर पुलाजवळ एका ट्रेलरने उतारावर ४८ वाहनांना जोरदार धडक दिली असून, त्यामुळे संपूर्ण परिसरात एकाच हाहाकार उडाला.

Accident Container blew up 48 vehicles driver absconding

पुणे: सातारा ते मुंबई महामार्गावरील त्यांना नहें स्मशानभूमीच्या वरील बाजूला असलेल्या भूमकर पुलाजवळ एका ट्रेलरने उतारावर ४८ वाहनांना जोरदार धडक दिली असून, त्यामुळे संपूर्ण परिसरात एकाच हाहाकार उडाला. रात्री साडेआठच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.

या ट्रेलरने पुढे असलेल्या वाहनांना एका पाठोपाठ धडक देत सुमारे ४०० ते ५०० मीटरच्या अंतरातील ४७ हून अधिक वाहनांना धडक दिली. त्यात प्रामुख्याने कारचा समावेश आहे. त्यानंतर पुढे जाऊन हा ट्रेलर थांबला.

नवीन कात्रज बोगद्यापासून सुरू होणारा तीव्र उतार हा गेल्या काही वर्षांपासून मृत्यूचा स्पॉट बनला आहे. आंध्र प्रदेशाचा हा ट्रेलर साताऱ्याकडून मुंबईकडे जात होता. या ठिकाणी तीव्र उतार आहे. त्यामुळे रात्री वाहतूक संथगतीने सुरू होती. वेगाने आलेल्या कंटेनरचालकाचे नियंत्रण सुटले. त्याने एका पाठोपाठ पुढे असलेल्या गाड्यांना धडक देण्यास सुरुवात केली. त्यात काही कार झाल्या. त्यातील प्रवासी जखमी झाले. वाहनांना धडक दिल्यानंतर तो एका ठिकाणी थांबला.

इयत्ता 8 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी तसेच सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांकरीता अतिशय उपयुक्त असे इंग्रजी व्याकरण अभ्यासण्यासाठी आवश्यक असे मोफत स्टडी मटेरीअल….  

माहिती मिळताच पोलिस, पीएमआरडीएचे अग्निशामक दल, रेस्क्यू वाहने तातडीने घटनास्थळी रवाना झाली. स्थानिक लोकांनी गाड्यांमधील लोकांना बाहेर काढून जवळच्या हॉस्पिटलमध्ये रवाना केले. संपूर्ण महामार्गावर एकच गोंधळ उडाला असून संपूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे. या वाहनांना धडक बसल्याने त्यातील ऑइल, डिझेल हे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर सांडले सर्वत्र काचांचा खच पडला. कंटेनर चालक फरार झाला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे. 

Web Title: Accident Container blew up 48 vehicles driver absconding

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here