संगमनेर: अपघातग्रस्त कंटेनर उचलताना क्रेनच रस्त्यावर उलटला
संगमनेर | Accident: संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील बाजारतळाजवळील ओढ्यातील अरुंद पुलानजीकाच्या अपघाती वळणावर अपघातग्रस्त मालवाहू कंटेनर उचलत असताना क्रेन रस्त्यावर उलटून अपघात झाल्याची घटना घडली. तळेगाव दिघे गावानजीक लोणी ते नांदूरशिंगोटे रस्त्यावर शनिवारी सकाळी ही घटना घडली.
या अपघातात क्रेनमधील दोन जण बालंबाल बचावले आहेत. तळेगाव दिघे येथील बाजारतळानजीक ओढ्यातील अरुंद पुलादरम्यान अपघाती वळण असणाऱ्या रस्त्याच्या कंटेनर मुंबई येथून साहित्य घेऊन नाशिककडून श्रीरामपूरच्या दिशेने शुक्रवारी सकाळच्या सुमारास जात होता. यावेळी हा मालवाहू ट्रक उलटून अपघातग्रस्त झाला.
या अपघातात कंटेनर चालक मोहम्मद दिलशाद रा. उत्तरप्रदेश व क्लीनर असे दोघे जण बचावले. अपघातग्रस्त झालेला कंटेनर उचलण्यासाठी शनिवारी क्रेन पाचारण करण्यात आले. मात्र क्रेन कंटेनर उचलत असताना क्रेन रस्त्यावर उलटला. क्रेनमधील रामा रोकडे व नामदेव रामकर रा. नानज दुमाला हे दोघे बचावले. यावेळी रस्त्यावर वाहनांच्या लांबच रांगा लागल्या होत्या. वाहतूक ठप्प झाली होती.
Web Title: Accident crane overturned on the road while lifting the container