Ahmednagar News Today: विजेचा शॉक बसल्याने एकाचा मृत्यू
श्रीरामपूर | Ahmednagar News Today: श्रीरामपूर तालूक्यातील नाउर येथे पोलच्या तारेला चिकटल्यामुळे विद्यतप्रवाहाचा शॉक बसल्याने विलास अशोक देसाई वय २१ या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विजेच्या पोलवर घराची वीज जोडत असताना अचानक बंद असलेला विद्युत पुरवठा सुरु झाल्यामुळे पोलच्या तारेला चिकटून हा अपघात घडला. महावितरणच्या दुर्लक्षित कारभाराबद्दल नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून याबाबत त्वरित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून दोषींवर कारवाई कारवाई अशी मागणी केली आहे.
देसाई यांच्या घरातील विद्युत पुरवठा दोन दिवसांपासून बंद पडला होता. खंडित केलेला वीजपुरवठा जोडण्यासाठी विलास पोलवर चढला असता दुसऱ्या फिडरचा वीजप्रवाह सुरु असल्यामुळे त्याला शॉक बसला. त्याला पोलवरून खाली काढून उपचारासाठी कामगार हॉस्पिटल येथे आणले असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. याप्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पत्रावरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. महावितरणने विलासच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी अशी मागणी होत आहे.
Web Title: Ahmednagar News today One dies of electric shock