Home Accident News अहमदनगर ब्रेकिंग: कार झाडाला आदळून माय लेकीचा मृत्यू, तिघे जखमी

अहमदनगर ब्रेकिंग: कार झाडाला आदळून माय लेकीचा मृत्यू, तिघे जखमी

Ahmednagar Accident: चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार लिंबाच्या झाडावर आदळून माय लेकीचा मृत्यू, कारमधील इतर तिघे जखमी, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु. भिंगार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

Accident daughter died after the car hit a tree

अहमदनगर: चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार लिंबाच्या झाडावर आदळून झालेल्या अपघातात माय-लेकीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सायंकाळी नगर-जामखेड रोडवरील निंबोडी (ता. नगर) शिवारात घडली. या अपघातात कारमधील अन्य तिघे जखमी झाले आहेत. विनिता दीपक उघडे (26) व मुलगी रास्वी दीपक उघडे (वय दीड वर्ष रा. मुलुंड, ठाणे) अशी मयतांची नावे आहेत. तर कार चालक दीपक सुधाकर उघडे (वय 33 रा. मुलुंड ठाणे), प्रथमेश रामचंद्र कनोजिया (वय 31 रा. खडकी, पुणे) व एक अनोळखी मुलगी जखमी झाले आहेत.

या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार अमोल आव्हाड यांनी फिर्याद दिली आहे. दीपक उघडे हे कुटुंबासह बीड येथून मुंबईकडे जात होते. ते निंबोडी शिवारात आल्यावर त्यांच्या ताब्यातील कारचा ताबा सुटून कार लिंबाच्या झाडाला जाऊन आदळली. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

अपघाताची माहिती भिंगार कॅम्प पोलिसांना कळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने जखमींना रूग्णालयामध्ये दाखल केले. घटनेची माहिती मृतांच्या नातेवाईकांना देण्यात आली आहे. तर दुसरीकडे जखमींवर रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक किरण साळुंखे करीत आहेत.

Web Title: Accident daughter died after the car hit a tree

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here