Home महाराष्ट्र दोन जुळ्या बहिणींनी केला एकाच मुलासोबत विवाह: चर्चेला उधाण

दोन जुळ्या बहिणींनी केला एकाच मुलासोबत विवाह: चर्चेला उधाण

Two twin sisters married with one child:  जुळ्या बहीणीतील एकीचे प्रेम जडले. एकाच वरास जीवनसाथी म्हणून निवड करीत एकत्रित शुभमंगल सावधान केल्याची घटना शुक्रवारी अकलुज येथे घडली.

two twin sisters married with one child

अकलुज | Akluj : जन्म एकत्रित, बालपण एकत्रित, शिक्षण एकत्रित नोकरी ही एकत्रित असा जीवनाचा प्रवास एकत्रित करणा-या रिंकी व पिंकी जुळ्या बहिणीना एकमेकींची एवढी सवय झाली की त्या एकमेकी शिवाय जगूच शकत नसल्याने दोघींनी एकाच वरास जीवनसाथी म्हणून निवड करीत एकत्रित शुभमंगल सावधान केल्याची घटना शुक्रवारी अकलुज येथे पडली असुन विशेष म्हणजे दोन्ही मुली आयटी इंजिनिअर आहेत. एकाच आयटी कंपनीत इंजिनिअर पदावर कार्यरत आहेत.

कांदिवली येथील रिंकी व पिंकी उच्च विभूषित शिक्षण घेवुन आय टी क्षेत्रात मोठ्या पगारावर नोकरी करणाऱ्या जुळ्या बहिणी बरोबर अंधेरी येथील अतुल या युवकाशी काल शुक्रवारी दुपारी दोन्ही परीवाराच्या सहमतीने हॉटेल गलांडे येथे मोठ्या थाटामाटात पार पडला या विवाहाचे फोटो व चित्रीकरण व्हायरल झाल्याने अकलूज परीसरात चर्चेला उधाण आले असुन सर्वानाच या विवाहा विषयी उत्सुकता लागली आहे. या संदर्भात आज शनिवारी नव दाम्पत्याची भेट झाली असता या विवाहा विषयी उलगडा झाला.

रिंकी व पिंकी या जुळ्या बहिणीचा जन्म एकत्रित होवुन बालपणापासून या जुळ्या बहीणी एकाच ताटात जेवणे, एकसारखे ड्रेस परिधन करणे अशी सवय लागल्या तर एकीला त्रास झाला कि दुसरीला त्रास जाणवतो अशी स्थिती दोघींची आहे. एकमेकींची आवड निवडही एकच असल्याने दोर्घीना एकमेकींची सवय लागुन गेली. शिक्षण एकत्रित करुन आय टी इंजिनिअर झाल्यानंतर एकाच आय टी कंपनीत नोकरीस लागल्या. वडीलांच्या पाश्चात दोघीही बहीणी आई सोबत राहत होत्या.

Business Idea | कार मधून कसे पैसे कमवतात | Car Business Earn Money

गत सहा महिन्यापुर्वी रिंकी, पिंकी व आई आजारी पडल्यानंतर अतुल या टॅक्सी ट्रॅव्हल करणाऱ्या युवकाने तीघींना रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या कुटुंबात पुरुष नसल्याने माणुसकीच्या नात्याने अतुलने तिधींची रात्रदिवस सेवा केल्याने तिघींना अतुल विषयी आपुलकी निर्माण होवुन यातूनच जुळ्या बहीणीतील एकीचे प्रेम जडले. पण दोघी एकमेकींना कधीच सोडले नसल्याने त्या विभक्त होवुन राहु शकत नसल्याने दोघींनी अतुलशी विवाह करण्याचा निर्णय घेतला तर रिंकीपिंकीच्या आईनेही अतुलच्या परोपकारी वृत्तीमुळे व मुलींच्या भावनांच विचार करून एकत्रित विवाहास संमती दिल्याने काल शुक्रवारी हॉटेल गलांडे येथे नातेवाईकांच्या साक्षीने विधीवत अजब विवाह सोहळा संपन्न झाला. या विवाह सोहळ्याचे फोटो व चित्रीकरण सोशल मिडीया वर प्रसिद्ध झाल्याने सदरचा विवाहा चर्चेचा विषय बनुन सोशल मिडीयात काहींनी आम्हाला एक वधु मिळत नाही म्हणून खंत व्यक्त केली तर काहींनी एकीलाच सांभाळणं कठीण होत असल्याची प्रतिक्रीया उमटली आहे. काहींनी तर आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे अशीही प्रतिक्रीया उमटली आहे.

Web Title: two twin sisters married with one child

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here