Home Accident News सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा विहरीत तोल जाऊन दुर्दैवी मृत्यू

सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा विहरीत तोल जाऊन दुर्दैवी मृत्यू

Accident death of a sixth grader after being weighed in a well

श्रीगोंदे | Accident: तालुक्यातील येळपणे येथे एका ११ वर्षीय शाळकरी मुलाचा विहिरीत तोल जाऊन पडल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.

अभिषेक बाळू लकडे वय ११ असे मयत मुलाचे नाव आहे. येळपणे गावातील ठाणगेवाडी येथील अभिषेक हा विहिरीच्या कडेला असलेल्या बोराच्या झाडाला बोरे काढण्यासाठी गेला असता त्याचा तोल जाऊन तो विहिरीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला. तो बराच वेळ झाला तरी घरी ना आल्यामुळे त्याचा शोध घेतला असता विहिरीच्या कडेला त्याची चप्पल दिसून आली. संशय आल्यामुळे बांबूच्या सहाय्याने विहिरीत पहिले असता त्याचा मृतदेह आढळून आला.

सोमवारी अभिषेकवर अंत्यसंस्कार करण्यात आले. अभिषेक हा श्री. खंडेश्वर माध्यमिक विद्यालय येळपणे येथे सहावीत शिकत होता. अभिषेक याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.   

ब्रेकिंग: अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग अपडेट वाचण्यासाठी  संगमनेर अकोले न्यूज नवीन सुपर फास्ट स्वरूपात आजच आपला  अॅप येथून अपडेट करा.   संगमनेर अकोले न्यूज 

Web Title: Accident death of a sixth grader after being weighed in a well

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here