Home क्राईम संगमनेरातील घटनेने खळबळ: महिलेचा खून करून मृतदेह गटारात फेकला

संगमनेरातील घटनेने खळबळ: महिलेचा खून करून मृतदेह गटारात फेकला

Sangamner Murder killed the woman and threw her body in the gutter

संगमनेर |Murder | Sangamner: संगमनेर तालुक्यातील गुलेवाडी गावाच्या शिवारात एका महिलेचा मृतदेह मृतदेह गटारीच्या एका टाकीमध्ये फेकून दिल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

एका 40 वर्षीय महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह गटारीच्या एका टाकीमध्ये फेकून दिल्याची घटना  घडली. काल दुपारी नाशिक – पुणे महामार्गावरील घुलेवाडी गावाच्या हद्दीत असलेल्या माझे घर हौसिंग सोसायटीजवळ श्रमिक बीडी कामगार वसाहतीच्या मोकळ्या जागेत हा प्रकार घडला. दोन ते तीन दिवसापूर्वी तिचा खून करून मृतदेह सेफ्टी टँकमध्ये टाकलेला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.

माझे घर हौसिंग सोसायटी परिसरातील श्रमिक विडी कामगारांच्या वसाहती जवळ असलेल्या एका सेफ्टी टँक मध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ही माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी सदर महिलेचा मृतदेह सेफ्टी टँक च्या बाहेर काढला.  यावेळी दुपारी या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी प्रारंभी आकस्मात मृत्यूची नोंद केली होती. सदर महिलेची ओळख पटू शकली नाही.

अज्ञात इसमाने अज्ञात करण्यासाठी या महिलेचा खून करून तिचा मृतदेह या पाण्यात टाकलेला आढळून आले. याबाबत पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा रात्री उशिरा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निकीता महाले अधिक तपास करीत आहेत.

ब्रेकिंग: अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग अपडेट वाचण्यासाठी  संगमनेर अकोले न्यूज नवीन सुपर फास्ट स्वरूपात आजच आपला  अॅप येथून अपडेट करा.   संगमनेर अकोले न्यूज 

Web Title: Sangamner Murder killed the woman and threw her body in the gutter

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here