Home क्राईम Crime News: संगमनेर शहरात एकावर चाकू हल्ला

Crime News: संगमनेर शहरात एकावर चाकू हल्ला

Crime News One stabbed in Sangamner town

संगमनेर | Sangamner | Crime News: किरकोळ कारणातून एकावर चाकू हल्ला झाल्याची घटना शहरातील मेनरोड परिसरात झाली. याप्रकरणी आरोपी शहर पोलिसांनी अटक केली आहे. 

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शिवाजी विकास भोडगे रा. वाडेकर गल्ली, साई अविनाश घुले रा. नवीन नगर रोड हे दोघे शहरातील मेनरोड चावडी येथे उभे होते. याठिकाणी अनास कलीम शेख रा. मोगलपुरा उभा होता. त्यांची किरकोळ कारणातून बाचाबाची झाली. शेख याने त्याच्या खिशातून चाकूसारखे धारदार हत्यार काढून शिवाजी यांच्या दंडावर वार केला. यामध्ये तो जखमी झाला. 

ब्रेकिंग: अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग अपडेट वाचण्यासाठी  संगमनेर अकोले न्यूज नवीन सुपर फास्ट स्वरूपात आजच आपला  अॅप येथून अपडेट करा.   संगमनेर अकोले न्यूज 

साई घुले याने जवळच असलेल्या शहर पोलीस ठाण्यात नेले. याबाबत शिवाजी भोडगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अनास कलीम शेख याच्याविरोधात कलम ३२६ प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे. शहर पोलिसांनी आरोपीस त्वरित अटक केली आहे.  

Web Title: Crime News One stabbed in Sangamner town

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here