Accident | शेवटच्या पेपरला जात असताना विद्यार्थिनीचा अपघाती मृत्यू
नंदुरबार: आयटीआयचा शेवटचा पेपर देण्यासाठी जात असलेल्या तरुणीचा अपघातात (Accident) मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महाविद्यालयीन तरुणी आपल्या मित्रांसोबत मोटारसायकलवरून पेपरला निघाली होती. मात्र वाटेतच कंटेनरने दिलेल्या धडकेत तिचा जागीच मृत्यू (Death) झाला.
नंदुरबार जिल्ह्यातील नवापुर तालुक्यात हा अपघात घडला. सुमन गावित असं मयत झालेल्या तरुणीचे नाव आहे. नवापूर तालुक्यातील वडखुट गावाची रहिवाशी असलेली सुमन गावित आयटीआयमध्ये शिक्षण घेत होती. गुरूवारी तिचा शेवटचा पेपर होता. पेपर देण्यासाठी ती आपल्या मित्रांसह दुचाकीवरून कॉलेजला निघाली होती. नवापुर तालुक्यातील नवी सावरट गावाजवळ आल्यानंतर भरधाव वेगाने येत असलेल्या कंटेनरने त्यांचा दुचाकीला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, सुमन आणि तिचा मित्र महामार्गावर फेकले गेले.
या अपघातात सुमनच्या अंगावरून कंटेनरचे चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर तिचा मित्र गंभीर जखमी झाला.
Web Title: Accident death of a student while going to paper