Home नाशिक नाशिक हादरलं​! मुलाची हत्या करून वडिलांनी केली आत्महत्या

नाशिक हादरलं​! मुलाची हत्या करून वडिलांनी केली आत्महत्या

Nashik Son Murder and father Suicide

नाशिक | Nashik : नाशिकमध्ये मुलाची हत्या (Murder) करून  वडिलांनी आत्महत्या (Suicide) केल्याची  धक्कादायक घटना घडली आहे. नाशिकच्या पंचवटी परिसरात ही घटना घडली आहे. राहत्या घरात गळफास घेऊन दोघांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस यंत्रणा तपास करीत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जगदीश जाधव आणि प्रणव जाधव असं वडिलांचे आणि मुलाचे नाव आहे. सकाळी पंचवटी सीतागुंफासमोर मुलाचा खून करून वडिलांनी आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. दोघांचा मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या आत्महत्या मागील कारण अद्याप समोर आले नाही. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Web Title: Nashik Son Murder and father Suicide

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here