Home औरंगाबाद रूम पार्टनर कामावर जाताच मैत्रिणीला घरी बोलावले अन…

रूम पार्टनर कामावर जाताच मैत्रिणीला घरी बोलावले अन…

roommate went to work, he called his girlfriend home murder 

औरंगाबाद | Aurangabad Crime : रुम पार्टनर मित्र कामावर जाताच मैत्रिणीला घरी बोलावून काही वेळातच तिची क्रूरपणे हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. औरंगाबाद शहरातील नारेगाव परिसरात बुधवारी सायंकाळी  ही खळबळजनक घटना घडली.

रेणुका देविदास ढेपे (वय 20) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. तिचा मित्र शंकर हागवणे हा पसार झाल्याने त्याच्यावर हत्येचा संशय आहे. शंकरचे चारही मित्र कामावरून परतल्यानंतर त्यांना आपल्या खोलीत रेणुका रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळून आली.

मूळचा वाशीम जिल्ह्यातील असलेला २५ वर्षीय शंकर हा औरंगाबाद शहरात भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतो. शहरातील नारेगाव परिसरात तो भाड्याच्या घरात राहत होता. शंकर याच्यासोबतच त्याचे तीन मित्रदेखील तेथेच राहतात. रेणुकासोबत शंकरची काही महिन्यांपासूनची ओळख होती. ओळखीचे रूपांतर नंतर मैत्रीत झाले. स्थानिकांच्या माहितीनुसार, रेणुका नेहमी शंकरच्या खोलीवर येत असे. बुधवारी ती शंकरला भेटायला आली होती.

रेणुका जेव्हा शंकरला भेटायला आली तेव्हा शंकरचे इतर चार मित्र कामावर गेले होते. त्यानंतर शंकर आणि रेणुका हे दोघेच खोलीत होते. कंपनी सुटल्यानंतर सायंकाळी पाच वाजता इतर मित्रखोलीवर आले तेव्हा त्यांना घराचा दरवाजा व लोखंडी गेट दोन्ही उघडे दिसले. खोलीत जाताच त्यांना रेणुका रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. हा सर्व प्रकार पाहून ते थक्क झाले त्यांनी लगेच घरमालकाला कळविले.  

सदर घटनेची माहिती मिळताच  सिडको पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर रेणुकाचा मृतदेह घाटीत पाठवला. रेणुका हिची हत्या करून शंकर हा फरार झाल्याने त्यानीच ही हत्या केली असावी असा संशय पोलिसांना आहे. शंकरच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथके रवाना करण्यात आली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

Web Title: roommate went to work, he called his girlfriend home murder 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here