Home महाराष्ट्र Rain Alert  | राज्यात पुढील चार दिवस पावसाची शक्यता

Rain Alert  | राज्यात पुढील चार दिवस पावसाची शक्यता

rain Alert in the next four days in the state

मुंबई | Rain Alert:  मान्सून सहा दिवस अगोदरच अंदमानात दाखल झाला आहे. राज्यात देखील वातावरणात बदल झालेला दिसून येत आहे. महाराष्ट्रात देखील मान्सून लवकर दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

सध्या वातावरणात झालेल्या बदलांमुळे राज्यात पुढचे चार दिवस पावसाची (Rain) शक्यता आहे. पुढील तीन ते चार दिवसांत राज्यातील काही भागात गडगडाटासह पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दर्शवला आहे.

राज्यात 21 मे पर्यंत कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. राज्यातील काही भागात पाऊस हजेरी लावणार असून विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राच्याही काही भागात उष्णतेची लाट असणार आहे.

Web Title: rain Alert in the next four days in the state

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here