Home Maharashtra News Accident: चहा पिण्यासाठी जात असलेल्या दोघा मित्रांचा अपघाती मृत्यू  

Accident: चहा पिण्यासाठी जात असलेल्या दोघा मित्रांचा अपघाती मृत्यू  

Accident death of two friends who were going for tea

Aurangabad | औरंगाबाद:  चहा पिण्यासाठी जात असताना त्याच्या दुचाकीचा अपघात (Accident)  झाल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना कागझिपुराजवळ मंगळवारी सायंकाळी साडे सहा ते सात वाजेच्या दरम्यान घडली. या घटनेने मृतांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

जयेश निरंजन घोरपडे आणि मधुर बाळासाहेब भडांगे अशी मृतांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, औरंगाबादहून चार मित्र दोन दुचाकीवर चहा पिण्यासाठी खुलताबाद जवळील कागझिपुरा येथे जात होते. या दरम्यान एका वळणावर दुचाकीचे नियंत्रण सुटले. त्यामुळे एक दुचाकी रस्त्याच्याकडेला असलेल्या दुभाजकाला धडकली. या धडकेत दुचाकीवरील दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. त्यामुळे परिसरात राहणाऱ्या लोकांमध्ये एकच खळबळ उडाली. दोघेही मृत व्यक्ती हे औरंगाबादचे राहणारे असून चांगले मित्र आहेत.  या अपघातामुळे खुलताबाद औरंगाबाद महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

Web Title: Accident death of two friends who were going for tea

Previous articleराज्यपाल भगतसिंह कोशारी यांना कोरोनाची लागण
Next articleसंगमनेर: चोरीचा आरोप करणारा फिर्यादीच निघाला आरोपी – Theft

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here