Home संगमनेर संगमनेर: चोरीचा आरोप करणारा फिर्यादीच निघाला आरोपी – Theft

संगमनेर: चोरीचा आरोप करणारा फिर्यादीच निघाला आरोपी – Theft

Sangamner accused, who was accused of theft, left

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील कोकणगाव ग्रामपंचायतीच्या मालकीची पाणी वाटपाची रोख रक्कम हडपण्यासाठी चोरीचा (Theft) बनाव करणारा फिर्यादीच आरोपी निघाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. जबरी चोरीचा बनाव करणारा व त्याचा साथीदार अशा दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अजय अर्जुन जोंधळे (वय 24, रा. कोकणगाव, ता. संगमनेर), विजय राजेंद्र पारधी (वय 22, रा. शिवापुर, कोकणगाव, ता. संगमनेर) अशी आरोपींची नावे आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अजय अर्जुन जोंधळे (वय 24 वर्षे, रा. कोकणगाव, ता. संगमनेर) याने संगमनेर शहर पोलीस स्टेशन  येथे फिर्याद दिली की, दि. 17/06/2022 रोजी रात्री 09-30 वा. सुमारास ज्ञानमाता शाळे जवळवुन संगमनेर येथे लोणी रोडने कोकणगाव येथे जाण्यासाठी रोडचे कडेला गाडीची वाट पाहत उभा असताना तीन अनोळखी इसमांनी त्याला जबर मारहाण करीत फिर्यादीचे पॅन्टचे खिशामध्ये ग्रामपंचायत कार्यालय कोकणगाव यांचे मालकीचे पाणी वाटपाची 9 हजार रुपये रोख रक्कम बळजबरीने चोरुन नेली. याबाबत फिर्याद दिल्याने संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर गुन्ह्याच्या तपासाबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या त्यांच्या पथकास आरोपींचा शोध घेण्याबाबत सूचना केल्या. पोलिस पथकाने गुन्हा घडला त्या ठिकाणाच्या व आजुबाजुच्या सी.सी.टी.व्ही. फुटेज चेक केले व तांत्रीक तपास केला असता सदरचा गुन्हा घडलेला नसुन फिर्यादीनेचे ग्रामपंचायत, कार्यालय कोकणगाव यांचे मालकीची रोख रक्कम हडप करण्यासाठी सदरचा गुन्ह्याचा बनाव केल्याचे निष्पन्न झाल्याने फिर्यादीस ताब्यात घेवुन त्यांचेकडे विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले. सदरचा बनाव करणे करीता त्याचा साथीदार विजय पारधी याने मदत केल्याचे त्याने सांगितले.

पोलिसांनी विजय राजेंद्र पारधी (वय 22, रा. शिवापुर, कोकणगाव, ता. संगमनेर) यास ताब्यात घेवुन त्याचेकडे विचारपुस केली असता त्याने सदरचा बनाव केल्याची कबुली दिली आहे. पोलीस पथकाने सदरच्या दोन्ही आरोपींना संगमनेर शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

Web Title: Sangamner accused, who was accused of theft, left

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here