Home संगमनेर संगमनेर तालुक्यात विहिरीत अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

संगमनेर तालुक्यात विहिरीत अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

finding the dead body of an unknown man in a well in Sangamner taluka

Sangamner | संगमनेर: संगमनेर तालुक्यात नान्नज दुमाला शिवारात ३० ते ३५ वयाच्या अज्ञात पुरुषाचा मृतदेह (Dead body) आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच संगमनेर तालुक्यातील पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले.

बुधवारी सकाळी नान्नज दुमाला शिवारातील अण्णासाहेब कृष्णा चकोर यांच्या मालकीच्या विहिरीत अनोळखी पुरुषाचा मृतदेह तरंगताना आढळला. पोलिसांना माहिती मिळताच पोलिसाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अंदाजे ३ ते ३५ वयाचा हा इसम आहे. क्रेनच्या सहाय्याने हा मृतदेह बाहेर काढण्यात आला. अद्याप या मृतदेहाची ओळख पटलेली नाही. संगमनेर तालुक्याचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ओळख पटविण्याचे कार्य पोलिसांकडून सुरु आहे. याप्रकरणी अधिक तपास संगमनेर तालुका पोलीस करीत आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Web Title: finding the dead body of an unknown man in a well in Sangamner taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here