अहमदनगर जिल्ह्यातील या तालुक्यात अवकाळी पावसाची दमदार हजेरी-Rain
Rahuri | राहुरी: जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात पूर्वभागात अवकाळी पावसाने (rain) जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. यामुळे कापूस व सोयाबीनच्या पिकांना दिलासा मिळणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून तालुक्यात पावसाची प्रतीक्षा होती. जिल्ह्यात पाऊस नसतांना देखील अनेक शेतकर्यांनी तालुक्याच्या पुर्व भागात कापूस व सोयाबिन पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केली होती. अनेक दिवसाच्या प्रतिक्षेनंतर पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरणात पसरले आहे. काही भागात वीज पुरवठा काही काळ खंडीत झाला आहे.
Web Title: Heavy rain in this taluka of Ahmednagar