Home Accident News संगमनेर: दुचाकीला रिक्षाने धडक दिल्याने अपघात

संगमनेर: दुचाकीला रिक्षाने धडक दिल्याने अपघात

Sangamner Accident:  खांडगाव फाट्याजवळून जात असताना दुचाकीला एका रिक्षाने धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील मुलगा गंभीर जखमी.

Accident due to a two-wheeler being hit by a rickshaw

संगमनेर: खांडगाव फाट्याजवळून जात असताना दुचाकीला एका रिक्षाने धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील मुलगा गंभीर जखमी झाला आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात अज्ञात रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रवींद्र भिमाशंकर थोरात (रा. उक्कलगाव, ता. श्रीरामपूर) हे त्यांच्या ताब्यातील दुचाकीहून खांडगाव फाट्याकडून रात्रीच्यावेळी येत असताना एका रिक्षाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत रवींद्र थोरात व त्यांचा मुलगा वरुण हे गंभीर जळमी झाले. रिक्षा अपघात होताच चालकाने पळ काढला. याबाबत रविंद्र थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक धादवड करत आहेत.

Business Idea | तुम्हाला तुमचा स्वतः चा बिजनेस सुरु करायचा मग हा व्हिडियो जरूर पहा

Web Title: Accident due to a two-wheeler being hit by a rickshaw

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here