संगमनेर: ऊस तोडणी कामगार महिलेस मारहाण व अपमानास्पद वागणूक
Sangamner Crime: ऊस तोडणी कामगार महिलेस मारहाण करून तिला अपमानास्पद वागणूक दिल्याची घटना.
संगमनेर: ऊस तोडणी कामगार महिलेस मारहाण करून तिला अपमानास्पद वागणूक दिल्याची घटना सोमवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास शहरातील मालदाड रोड परिसरात घडली.
मालदाड रोड परिसरात अनेक ऊस तोडणी कामगार राहतात. सोमवारी सकाळी दोघा ऊस तोडणी कामगारांमध्ये किरकोळ करणावरून वाद झाला. राजेंद्र आव्हाड याने तू माझे बायकोला उलट पालट का तू बोलतेस असे म्हणून ऊस तोडणी कामगार महिलेस शिवीगाळ करून अपमानास्पद वागणूक दिली. याबाबत सदर महिलेने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी राजेंद्र कोंडीबा आव्हाड (राहणार महांदा, ता. आष्ठी, जि. बीड) याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता ३५४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार फटांगरे करत आहेत.
Business Idea | तुम्हाला तुमचा स्वतः चा बिजनेस सुरु करायचा मग हा व्हिडियो जरूर पहा
Web Title: Crime Beating and humiliating the sugarcane cutting worker woman
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App