Home Accident News Accident: अज्ञात वाहनाच्या धडकेत शेतकऱ्याचा मृत्यू

Accident: अज्ञात वाहनाच्या धडकेत शेतकऱ्याचा मृत्यू

Jamkhed Accident:  भाजीपाला विक्रीसाठी जामखेडला घेऊन जात असताना मोटारसायकलला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू.

Accident Farmer dies in collision with unknown vehicle

जामखेड: शेतातील भाजीपाला विक्रीसाठी जामखेडला घेऊन जात असताना मोटारसायकलला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. परमेश्वर प्रभाकर पिंपरे (रा. बसरवाडी शिऊर, ता. जामखेड) असे मयताचे नाव आहे. शनिवारी सकाळी ६ वाजता ही घटना घडली.

बसरवाडी येथील परमेश्वर पिंपरे हे भाजीपाला विक्रीसाठी शनिवारी सकाळी ६ वा मोटारसायकलवरून जामखेडकडे येत असताना शहरातील खर्डा रोडवरील मारुती मंदिर परिसरात अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला जोराची • धडक दिली. काही वेळातच पिंपरे यांना गंभीर अवस्थेत नागरिकांनी तातडीने ग्रामीण रुग्णालयात नेले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. युवराज खराडे यांनी तपासणी केली तेव्हा पिंपरे मयत झाल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी व अविवाहित ३ मुले असा परिवार आहे. सदर घटनेची खबर शिऊर येथील उपसरपंच सिद्धेश्वर लटके यांनी पोलीस स्टेशनला दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ज्ञानेश्वर भागवत हे करत आहेत.

Web Title: Accident Farmer dies in collision with unknown vehicle

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here